Saturday, April 8, 2017

सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 13

पंकज वळवी | 1:29:00 PM 1 Comment so far

13. कर्नाटकचे गुप्तवचन, प्रो. जॉर्ज आणि लुटारु (1)

पुढच्या काही मिनीटात आणखी काही वस्तु पाहुन झाल्यावर आयेशा पुढे असलेल्या एका हॉलमध्ये शिरली. हॉलच्या दोन्ही बाजुंना तश्याच प्रकारचे काऊंटर होते. डाव्या बाजुवरील पहिल्या काऊंटरवर काचेच्या आवरणात फक्त एका लांब आणि तुटलेल्या हाडाचा तुकडा ठेवलेला होता.

“आता हे काय? हे तर काही बोचकायला वगैरे नाही येत ना?” सॅंडीने आयेशाकडे न पाहता उपहासाने विचारले.

“सॅंडी शांत बस बाळा!” समीरची आई सॅंडीला समजावत म्हणाली. समीरनेही सॅंडीला डिचवले.

“सॉरी!” सॅंडी खाली मान टाकत म्हणाला.

आयेशा मात्र तिचे काम चोखपणे बजावत होती जणु तिला या गोष्टींचा काही फरक पडत नव्हता. ती आपली पुन्हा सुरु पडली.

Friday, July 15, 2016

सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 12

पंकज वळवी | 9:24:00 AM Be the first to comment!

सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 12

 

12. डॉ. जॉर्ज आर्किओलोजिकल म्युझिअम

ते सर्वजण आता म्युझिअमच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेच होते की, सावळ्या रंगाची सुंदर व देखणी, जींस-कुडता घातलेली एक मुलगी त्यांना समोरुन येताना दिसली. तिने आपले काळेभोर केसं घट्ट आवळुन मागे बांधले होते. डोळ्यांत लावलेल्या काजळमुळे तिचे संपुर्ण सौंदर्य जणु तिचा डोळ्यांत सामावुन गेल्यासारखे वाटत होते. तिच्या नाजुक ओठांवर अलगद आलेलं ते स्मितहास्य आकर्षित करणारं होतं. त्यांचासमोर येऊन तिने छान स्मितहास्य केलं आणि तिच्या खास शैलीत बोलु लागली.

Saturday, May 21, 2016

सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 11

पंकज वळवी | 5:06:00 PM Be the first to comment!

सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 11


11. तोरणे आजोबा 

काही वेळातच सॅंडीचा सांगण्यानुसार मि. वसावेंनी गाडी कोथरुडमधील रस्त्याला लागुनच असलेल्या एका बंगल्यासमोर उभी केली. ‘विठोबा’ हे त्या बंगल्याचे नाव. इथेच त्यांची रूम होती. बंगला अतिशय देखणा होता, आत बरीच हिरवळ दिसत होती आणि बंगल्याला कंपाऊंड केलेले होतं. बंगल्याचा वर केशरी रंगाच्या चौकडीत चंदेरी अक्षरात ‘विठोबा’ लिहीलेले होते. बंगल्याचे मुख्य द्वार हे थोडे उजव्या बाजुला होते आणि बंगल्याच्या डाव्या बाजुच्या भिंतीला समीर व सॅंडीचा रूमचा प्रवेशद्वार होता.


सॅंडी बंगल्याचे गेट उघडुन आत शिरला, त्याचा मागोमाग सर्वजण आत आले. वयाची पासष्टी ओलांडलेले एक आजोबा आवाज ऐकुन बाहेर आले.
 
“आलेत का?....नमस्कार! मी गंगाधर तोरणे, या बंगल्याचा मालक,” म्हणत त्यांनी स्वागत केले.

Monday, March 21, 2016

सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 10

पंकज वळवी | 4:31:00 PM Be the first to comment!


 सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 10


10. वुल्फ गॅंग 

मुंबईत कुठेतरी...एका अंडरग्राऊंड असलेल्या मोठ्या जुन्या बंगल्यात...

सर्वत्र मंद उजेड पसरलेला होता. अंडरग्राऊंड असल्याने सुर्याचा उजेड यायचा प्रश्नच नव्हता. अनेक जुन्या लाकडी आणि पारदर्शक काच असलेल्या कपाटांत अनेक पुरातन चित्रविचित्र वस्तु ठेवलेल्या होत्या. मळकटलेल्या दगडी भिंतींवर सर्वत्र अनोळखी माणसांचे फोटो लावलेले होते. काहींवर रक्तही शिंपडण्यात आले होते. घराच्या भिंतींवर चोहीबाजुंना लावलेल्या मशाली जळत होत्या. त्यांच्या प्रकाशात ते घर जास्तच भयानक भासत होते. 

सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 9

पंकज वळवी | 4:13:00 PM Be the first to comment!सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 8

 9.अनाकलनीय

तो ज्या उतरतीच्या पायथ्यावर उभा होता तो एक डोंगर होता आणि हा तोच तोरणमाळचा डोंगर होता जो त्याने आज टीव्हीवर पाहिला होता. वीजेच्या उजेडात दिसणारे ते प्राचीन महालाचे अवशेष जणु त्याला साद घालीत होते. समीर आवासुन त्यांकडे पाहतच राहीला. 

“नाही...हे शक्य नाही; हे खरं नाहीये. हे कसं काय होऊ शकतं?” समीर आता वेडासारखा स्वत:शीच बरळायला लागला होता, पण पुन्हा एकदा जोरात ढगांचा गडगडाट झाला म्हणुन तो शुद्धीवर आला.

 “कदाचित मी यांसाठीच इथे आहे,” म्हणत समीर आता त्या अवशेषांकडे जाऊ लागला. 
नवीन पोस्ट मिळविण्यासाठी ईमेल सबस्क्राईब करा!